श्रीगोंदा पोलिसांकडून मद्यनिर्मितीचे साहित्य जप्त

0 1

श्रीगोंदा-श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅ क्टरी येथे पेट्रोल पंपाच्या शेजारी एका दुकानात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ व नवसागर या साहित्याच्या अड्ड्यावर श्रीगोंदा पोलिसांनी 5 रोजी रात्री छापा टाकून तब्बल 72 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नामदेव तुकाराम बांगर यास पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील श्रीगोंदा फॅ क्टरी येथे एक इसम पेट्रोल पंपाच्या शेजारी एका दुकानात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणार्‍या काळ्या गुळासह नवसागरची मोठ्या प्रमाणात राजरोसपणे विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना त्याच्या गुप्त माहितीदारांकडून मिळताच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर कर्मचारी अमोल कोतकर, विठ्ठल बड,े किसन औटी, दादासाहेब टाके, किरण बोर्‍हाडे, प्रताप देवकाते, प्रवीण गारुडकर, किरण भापकर, दीपाली मपोहे , अविंदा भंडलकर याचे एक पथक तयार करून श्रीगोंदा फॅक्टरी येथे कारवाई साठी रवाना करण्यात आले. या पथकाने सायंकाळी 8 चे सुमारास अचानक छापा टाकला असता त्या दुकानात दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ नवसागर असा एकूण तब्बल 72 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तसेच त्या अनधिकृतपणे विक्री करणारा नामदेव तुकाराम बांगर वय 65 यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर हे करत आहेत.