श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी

0

कोलंबो : श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अद्याप निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे, मात्र त्यांनी मोठी आघाडी घेतली असल्याने त्यांचा विजय हा जवळपास निश्चित झाला आहे. विरोधी उमेदवाराच्या ५२ टक्के मतांनी राजपक्षे पुढे आहे. अंतिम घोषणा रात्री होणार आहे. ते माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांचे बंधू आहेत. श्रीलंका फ्रीडम पार्टी असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.

श्रीलंकेतील आतंकवादी हमल्यानंतर मोठ्या सुरक्षेत मतदान झाले. विरोधी उमेदवाराच्या ५२ टक्के मतांनी राजपक्षे पुढे आहे. त्यांच्या विरोधात सजित प्रेमदासा, अनुरा कुमारा दिसनायके उमेदवार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे नवनियुक्त राष्ट्रपती राजपक्षे यांचे अभिनंदन केले आहे.