Wednesday , December 19 2018
Breaking News

श्रीलंकेत आणीबाणी!

मुस्लीम आणि बौद्धधर्मीयांमध्ये संघर्ष उफळला
वर्षभरापासून दोन्ही समुदायांमध्ये धुमसत आहे वाद

कोलंबो : जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दोन धर्मीयांमधील वाद भडकू नये त्यावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला. श्रीलंकेतील कॅण्डी भागात धार्मिक दंगल उसळली. त्यानंतर 10 दिवसांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हिंसा पसरवणार्‍या लोकांविरोधात कारवाई करणे हाच आणीबाणी लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. मंगळवारी सरकारच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. दरम्यान, कॅण्डीम या ठिकाणी जमावाने मुस्लिमांच्या दुकानांना आगी लावल्यानंतर सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे विशेष तुकड्या पाठवल्या. सिंहली बौद्ध आणि अल्पसंख्यांक मुस्लिमांमध्ये संघर्ष टाळण्यासाठी तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

धर्मांतर करण्याची जबरदस्ती
मागील सुमारे एक वर्षापासून बौद्ध आणि मुस्लीमधर्मीयांमध्ये संघर्ष आणि वाद सुरु होता. बौद्धधर्मीयांना जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मांतर करण्यास भाग पाडत आहेत असा बौद्धधर्मीयांचा आरोप आहे. तर बौद्धधर्माचा वारसा असलेली धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली जात असल्याचाही आरोप होतो आहे. हा सगळा वाद चिघळल्यामुळे आणि शिगेला पोहचल्यामुळे श्रीलंकेत 10 दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. म्यानमारमध्ये उसळलेल्या संघर्षानंतर काही रोहिंग्या मुस्लिमांनी श्रीलंकेत आश्रय घेतला होता. मात्र याबाबतही काही बौद्धधर्मीयांनी विरोध दर्शवला होता. तसेच त्यांना आश्रय दिला जाऊ नये म्हणून आंदोलनही केले होते. गेल्या वर्षभरापासून हा संघर्ष सुरु आहे. हा वाद चिघळू लागल्याने दोन समाजांमध्ये आणखी काही तेढ निर्माण होऊ नये म्हणून श्रीलंका सरकारने आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावरही बंदी
मंगळवारी श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीत आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जातीय दंगली, दहशत पसरू नयेत. तसेच निरपराध लोकांचा बळी जाऊ नये म्हणून श्रीलंकेने ही कृती केली. ही आणीबाणी सध्या तरी दहा दिवसांची आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानंतर यासंबंधीची घोषणा करण्यात येईल, असे सरकारी प्रवक्ते दयाश्री जयशेखरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साइटचा आधार घेत कोणीही या संदर्भात धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केला तर त्यावरही कारवाई केली जाईल. मुस्लीम धर्मीयांची दुकाने आणि घरे ज्या भागात आहेत त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच काही भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

About admin

हे देखील वाचा

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!