संजय राऊतांचा फडणवीसांना टोला; हिंदुत्वावरून शहाणपणा शिकवू नये !

0

मुंबई: आज दिवंगत शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृती दिन आहे. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करताना ट्वीटरवर एक व्हिडीओ टाकला आहे. त्यात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा संदेश दिला आहे. याची आठवण त्यांनी शिवसेनेला करून दिली आहे. दरम्यान यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी राजकीय नेत्यांसह शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर गर्दी केली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी फडणवीस यांना उत्तर दिले.