संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; बंद दार चर्चा !

0

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले मात्र अद्याप मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याने सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. दरम्यान राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असताना शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे शरद पवारांना भेटल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे ही राज्यातल्या शेतकऱ्यांची इच्छा आहे असं सांगितलं आहे. भाजपा आणि शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे शरद पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहचल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.