संजय राऊत यांचा निषेध : भाजपतर्फे जोडे मारो आंदोलन

0

पिंपरी चिंचवड ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी वंशज असल्याचा पुरावे द्यावेत, अशी मागणी करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रतिमेला भाजपतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, माजी महापौर राहुल जाधव, सदाशिव खाडे, उमा खापरे, सीमा सावळे, आशा शेंडगे, अमोल थोरात, राजू दुर्गे, मोरेश्‍वर शेडगे, प्रमोद निसळ, प्रकाश जवळकर, राजेश पिल्ले, विनायक गायकवाड, अनुप मोरे, आर एस कुमार, नगरसेविका शारदा सोनवणे, अनुराधा गोरखे, झामाबाई बारणे, योगिता नागरगोजे, जयश्री गावडे, उषा मुंढे, सोनाली गव्हाणे, शर्मिला बाबर, भीमाबाई फुगे, यशोदा बोईंनवाड, माधवी राजापुरे, सविता खुळे, संगिता भोंडवे, अश्‍विनी जाधव, साधना मळेकर, स्विनल म्हेत्रे, सुवर्णा बुर्डे, करुणा चिंचवडे, अर्चना बारणे, निर्मला गायकवाड, प्रियांका बारसे, हर्षल ढोरे, संदिप कस्पटे, नितीन लांडगे, राजेंद्र गावडे, अंबर कांबळे, अभिषेक बारणे, राजू लांडगे, संजय नेवाळे, सागर गवळी, बाळासाहेब ओहाळ, संतोष कांबळे, लक्ष्मण उंडे, विकास डोळस, कुंदन गायकवाड, चंद्रकांत नखाते, आशा काळे, महादेव कवितके, विणा सोनवलकर आदी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी वंशज असल्याचा पुरावा दाखवावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याच्या भाजपकडून निषेध करीत आंदोलन केले जात आहे.