संजय राऊत यांची प्रकृती बिघडली; लीलावतीत दाखल

0

मुंबई: एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसताना दुसरीकडे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाली आहे. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतेही बिघाड झाले नसून डॉक्टरांची भेट नियोजित होती, ती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होते, याबाबत त्यांनी डॉक्टरांची भेट मागितली होती. आजच ती भेट नियोजित होती असे बोलले जात आहे. पुढील दोन दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु राहणार आहे.

लीलावतीमध्ये त्याच्यावर अॅन्जिओग्रफ़ि होणार आहे.

आजच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. शिवसेनेकडून ते या घडामोडीत आहे. भाजप-शिवसेनेत बिनसले आहे. शिवसेनेची अधिकृत भूमिका संजय राऊत मांडत होते.