संत तुकारामनगरात तरुणाला रॉडने मारहाण

0

चिंचवड ः पूर्वीच्या भांडणावरून शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉडच्या सहाय्याने डोक्यात मारहाण करून तरुणाला जखमी केले. संत तुकारामनगर, पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. नईम अयाझ तांबोळी (वय 20, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तोईत शेख (वय 20), साहिल धनवे (वय 22), रोहित धनवे (वय 21, सर्व रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वीच्या भांडणावरून आरोपींनी लोखंडी गजाने फिर्यादी तांबोळी यांच्या डोक्याला मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.