संभाजी ब्रिगेडच्यावतीने महिलांची भव्य मोटारसायकल रॅली !

1

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडच्यावतीने  सोमवारी संध्याकाळी महिलांकडून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.   माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याहस्ते मोटारसायकल रॅलीला झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. काव्यरत्नावली चौकातून ही रॅली निघाली. या रॅली १५० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. महिलांनी भगवे फेटे, भगव्या साड्या प्रदान केल्या होत्या.  ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय जिजाऊ जय शिवराय’  च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.