संशोधक विद्यार्थी घडवणे हेच ध्येय

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.आर.शास्त्री यांचे प्रतिपादन

भुसावळ- विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तंत्रज्ञान मिळवून केवळ शिकणे नव्हे तर त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण कशी होईल ते स्वतः विश्‍लेषक कसे होतील? असे विद्यार्थी घडवायचे आहे. व्हिडिओ कॉन्फ्रन्सींगद्वारे सर्व एकमेकांना जोडून अनुभवाचे आदान-प्रदान करायचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सात कोटी दिले असून अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जात असून औद्योगिक क्षेत्रात नव-नवीन कोर्स करण्यावर आपला भर असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.आर.शास्त्री यांनी येथे पत्रकार परीषदेत दिली. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारोप कार्यक्रमप्रसंगी त्यांनी संवाद साधला.

सक्षम अभियंते घडवण्यावर भर
आगामी काळात देशाला महासत्ता व शक्तीशाली करण्यासाठी सक्षम, असे अभियंते कसे घडतील यासाठी माझे प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन डॉ. शास्त्री यांनी केले. त्यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचा कुलगुरु म्हणुन पदभार आहे. शास्त्री हे लोणेर, जि.रायगड येथे कार्यरत आहे. त्यांच्या अंतर्गत 105 महाविद्यालये आहेत व 66 संलग्नतेच्या प्रतीक्षेत आहे.

सक्षम अभियंते घडवण्यावर भर
आगामी काळात देशाला महासत्ता व शक्तीशाली करण्यासाठी सक्षम, असे अभियंते कसे घडतील यासाठी माझे प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन डॉ. शास्त्री यांनी केले. त्यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचा उपकुलगुरु म्हणुन पदभार आहे. शास्त्री हे लोणेर, जि.रायगड येथे कार्यरत आहे. त्यांच्या अंतर्गत 105 महाविद्यालये आहेत व 66 संलग्नतेच्या प्रतीक्षेत आहे.