सतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी

0

फैजपूर : सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट या धार्मिक व सेवाभावी संस्थेने 51 हजार रुपयांची देणगी कोरोना ग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला दिली आहे. प्रांत डॉ.अजित थोरबोले यांना 51 हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी देशाप्रती प्रेम, आपुलकी, बंधुभावभाव असून कोरोना या संकटावर मात करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे 51 हजार रुपये देणगी देण्यात आली. समाजातील सेवाभावी नागरिकांनी सढळ हाताने पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीला दान देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पत्रकार प्रा. उमाकांत पाटील व पत्रकार निलेश पाटील उपस्थित होते. प्रांत डॉ. अजित थोरबोले यांनी शासन करीत असलेल्या उपाययोजना, यात नागरिकांचा सहभाग व आपल्यासारखे संत-महंत यांनी पुढाकार घेऊन कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. त्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहे. आपण यात नक्कीच सफल होऊ. मात्र नागरिकांनी संयम ठेवून आपल्यासह मुलाबाळांची काळजी घ्यावी व घाबरून न जाता आलेल्या संकटाला तोंड देणे महत्त्वाचे ठरेल असे त्यांनी सांगितले. शेवटी महाराजांचे आभारही मानले.