सदाभाऊ खोत काढणार नवीन पक्ष

0

मुंबई: रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आपल्या संघटनेच्या जिल्हा, तालुका कार्यकारिणी समित्या बरखास्त केल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. यासाठी ते येत्या ५ फेब्रुवारी पासून राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राज्याची राजधानी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये पहिले अधिवेशन घेतलं जाणार आहे. तसेच नव्या पक्षाचा झेंडा आणि नाव जनतेतून आलं पाहिजे, म्हणूनच लोकांना नाव आणि झेंडा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुचवावं, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं.

सदाभाऊ खोत यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्यावरून सरकारवर निशाणा सुद्धा साधला. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी वंचित राहिला. आताच असो किंवा आधीच सरकार, शेतकरी कर्जमाफी देताना निकष न लावता कर्जमाफी केली पाहिजे होती, असे खोत म्हणाले.