सरकारच्या विरोधात काँग्रेसचा मोर्चा

0

पुणे – केंद्रातील भाजप सरकारच्या चुकिच्या आर्थिक धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आज(शुक्रवारी) सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला. नोटाबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असा काँग्रेस पक्षाचा आक्षेप आहे. शेती, उद्योग आदी क्षेत्रांना चुकीच्या आर्थिक धोरणांचा मोठा फटका बसला आहे. नोटबंदीने झालेल्या नुकसानीच्या विरोधात काँग्रेस पक्ष देशभर निषेध मोर्चे काढणार आहे. आजचा पुण्यातील मोर्चा त्याचाच भाग होता. मोर्चात पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, अभय छाजेड, आमदार अनंत गाडगीळ, संजय बालगुडे, लता राजगुरू, रजनी त्रिभुवन, संगीता तिवारी, सचिन तावरे आदी सहभागी झाले होते. फडके हौदापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. तिथे जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.