सरकारला न जुमानणाऱ्या कंपन्यांवर पोलिसांच्या धाडी

0

पुणे: एकीकडे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या या आदेशाकडे खाजगी कंपन्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील मगरपट्ट्यातील आयटी कंपनी, तसेच मीरा भाईंदर येथील कॉल सेंटरवर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे.

पुण्यातील आयटी कंपनीत काम करण्यासाठी बोलावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली. तर मीरा भाईंदर येथे एका कॉल सेंटरवर धड टाकत या ठिकाणी ५०० कर्मचारी काम करत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले.