सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह कर्मचाऱ्यांचा विमा उतरवावा

0

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष राहुल गावित यांची मागणी

नवापूर। कोरोना विरोधात लढणाऱ्या सरपंच,ग्रामसेवक यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरवावा, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषद नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष राहुल उदयसिंग गावित यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की आपण सर्वजण कोरोनाविरोधात एकत्रितपणे लढत आहोत. सुदैवाने नंदुरबार जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. आपला जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो .जिल्हातील ५५० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे सहकारी ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन गावोगावी मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. यामध्ये प्रत्येक गावात स्वच्छता फवारणी, बाहेरून आलेल्या बरोबर गावकऱ्यांची तपासणी ,मास्क, सेनीटायझर वाटप ,रक्तदान शिबिर घेत आहेत. त्याच बरोबरीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. एका ग्रामसेवकाकडे दोन, तीन ग्रामपंचायत, अपुरे कर्मचारी साधन सामग्री निधीचा अभाव अशा परिस्थितीवर मात करीत जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत .शासनाने कोरोना विरोधात काम करणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्या ५० लाखाचा विमा उतरवला आहे. त्याच धर्तीवर नंदुरबार जिल्हा परिषदेने सर्व सरपंच व सहकारी ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी किंबहुना जे कोरोना विरोधातील लढ्यात काम करीत आहे.