सर्वोत्तम कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड कॉग्रेसचा सन्मान

0

‘चलो पंचायत’ आणि ‘चलो वार्ड’अभियानातील कामगिरीचा गौरव

पिंपरी-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने जानेवारी 2019 पासून ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘चलो पंचायत अभियान’ आणि ‘चलो वार्ड’ अ भियानामध्ये पिपंरी चिंचवड शहर युवक काँग्रेसला सर्वोत्तम कामगिरीबद्दल विशेष कार्यरत जिल्हा म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे. पिपंरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. नवी मुंबईत सिडको प्रदर्शन केंद्रात नुकताच युवक काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत राज्यपातळीवर या अभियानाद्वारे पाच उत्तम जिल्हे निवडले गेले त्यामध्ये विशेष कार्यरत जिल्हा म्हणून पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते अध्यक्ष नरेंद्र बनसोडे आणि त्यांच्या टीमला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

10 हजारापेक्षा अधिक नोंदणी
कॉग्रेसने या अभियानांतर्गत पिपंरी चिंचवड शहर युवक काँग्रेसतर्फे 55 दिवसात 80 संवाद कार्यक्रम घेत सुमारे 10 हजार 511 युवा शक्ती कार्डस्ची नोंदणी करण्यात आली. वाड्यावस्त्यावर जाऊन युवक कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये याबाबत जनजागरण करत युवाशक्ती कार्ड नोंदणी द्वारे पिंपरीत 6 हजार 390 भोसरीत 3 हजार 003 व चिंचवड मतदारसंघात 1 हजार 118 एवढी व एकूण शहरातून सुमारे 10 हजार 511 नोंदणी केली. चलो वार्ड अभियानाच्या माध्यमातून युवक काँग्रेस पाच कलमी कार्यक्रम राबवीत आहे. यामध्ये बेरोजगारांना भत्ता, स्वंयरोजगार कार्यालयांचे सक्षमीक रण, महिला वसतीगृहांची निर्मिती, अल्प व्याज दराने शैक्षणिक कर्ज व बिनव्याजी व विनातारण व्यावसायिक कर्ज असा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी व अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव कृष्णा अल्लावरू, राज्य प्रभारी प्रतिभा रघुवंशी, जिल्हा प्रभारी कल्याणी मानगावे, प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, श शिकांत शिंदे, हिराचंद जाधव, नासीर चौधरी, संदेश बोर्डे, सौरभ शिंदे, गौरव चौधरी, वीरेंद्र गायकवाड, अनिकेत अरकडे, करण गील, कुदंन कसबे, बाळासाहेब डावरगावे, अनिल सोनकांबळे, फारू क खान, रोहित शेळके, शैलेश अनंतराव, स्नेहल गायकवाड, चंद्रशेखर जाधव, तुषार पाटील, अदित्य खराडे आदी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.