सर्व प्रवासी रेल्वे रद्द, २१ जूनपर्यंत संपूर्ण रिफंड

0

नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेत देशभरातील सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक सेवा ३१ मार्चपर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे या अवधीत अत्यावश्यक साधनसामुग्रीची ने-आण आणि माल वाहतूकच रेल्वेने होणार आहे.

रेल्वे बोर्डाच्या निवेदनात म्हटले आहे की, लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस व इंटरसिटी एक्स्प्रेस या ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या गाड्यांचा प्रवास कालावधी केवळ चार तास आहे त्याच गाड्या २२ मार्च रोजी धावणार आहेत. तिकिट रद्द केलेल्या प्रवाशांना त्यांचा संपूर्ण रिफंड हा २१ जूनपर्यंत देण्यात येणार आहे.