सलमान खानने घेतले पूरग्रस्तांचे पालकत्व !

0

मुंबई: बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध सिने अभेनेता सलमान खान कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव दत्तक घेणार आहे. गेल्यावर्षी अर्धे कोल्हापूर शहर पावसाच्या पाण्याखाली होतं. कोल्जापूर जिल्ह्यातील लोकांचे जनजीवन सुरळीत व्हावं यासाठी आता सलमान खानने त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ऐलान फाउण्डेशन आणि सलमान मिळून तिथल्या लोकांच्या आश्रयाची जबाबदारी उचलली आहे.

सलमानने सोशल मीडियावरही पुरग्रस्त पीडितांविषयी दुःख व्यक्त केलं होतं. सलमानच्या मते, घर असणं ही मुलभूत गरज आहे. याच जाणीवेतून तो लोकांची घरं बांधण्यासाठी मदत करणार आहे. तर या कामात सलमानची मदत मिळाल्याने आम्ही आनंदी झालो असं ऐलान फाउंडेशनचे संचालक रवी कपूर म्हणाले.

सलमान खानने याआधीही गरजूंना मदत केली आहे. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींपासून ते सेटवर काम करणाऱ्या स्पॉटबॉयपर्यंत सलमानने साऱ्यांना मदत केली आहे. एवढंच नाही तर बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटानेही सांगितलं की, जेव्हा ती इश्क इन पॅरिस सिनेमाचं चित्रीकरण करत होती तेव्हा निर्माती म्हणून तिला पैशांची गरज होती. त्यावेळी सलमानने तिला पैशांची मदत केली होती.