Sunday , March 18 2018

सलमान पुन्हा छोट्या पडद्यावर

सलमान खान व टीव्हीचे नाते फारच जवळचे आहे. त्याची अनोखी अदाकारी आणि सूत्रसंचालनाची तर्‍हा सर्वपरिचित अशी आहे. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा सलमानला छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. मात्र, यावेळी तो कुठल्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार नसून वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच एका मालिकेची निर्मिती तो आता करणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

या नव्या मालिकेत सलमान मुंबई पोलिसांच्या जीवनातील प्रसंग उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक चित्रपटांमधून सलमानने पोलीस व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. दबंग या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी दिलेली दाद आजही कायम आहे. पोलिसांच्या दैनंदिन कारकिर्दीतील समस्या, व्यथा मांडण्याचा मानस सलमानने व्यक्त केला आहे. आजवर सलमानने दोन टीव्ही शो केले असले तरी बिग बॉस सलमानमुळेच गाजला. दिगज्ज कलाकारांच्या मते या शोचे सूत्रसंचालन सलमानखेरीज दुसरे कोणी करूच शकत नाही. तेव्हा आता सलमानची नवी मालिका प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालीत कितपत आवडेल ते लवकरच समजू शकेल.

हे देखील वाचा

सैराटच्या ‘झिंग झिंग झिंगाट’ची नवी धडक…

नागराज मंजुळेचा सैराट लोकांनी डोक्यावर घेतला. आता याच चित्रपटाचा रिमेक जान्हवी कपूर आणि ईशानच्या धडकद्वारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *