सहाच महिन्यात शिस्तप्रिय दत्तात्रय शिंदेची झाली बदली

0 1

पंतप्रधानांचे चोरुन चित्रीकरणाचा ठपका की विनंती बदली ? चर्चांना उधाण

मुंबईला झाली बदली

उद्या स्विकारणार नूतन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबकुमार उगले पदभार

जळगाव- शिस्तप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची कार्यकाळ संपण्यापूर्वीच अवघ्या सहा महिन्यातच तडकाफडकी उचलबांगडी झाल्याने वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. पंतप्रधांनाचे चोरुन चित्रीकरण प्रकरण भोवल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याची तर दुसरीकडे त्यांनी विनंती केल्यावरुन त्यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे. 27 रोजी नूतन अधीक्षक डॉ. उगले हे आपल्या पदभार स्विकारणार असल्याचे त्यांनी फोनवरुन बोलतांना सांगितले.

राज्यातील 10 आयपीयएस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश सोमवारी सकाळी गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी पारित केले. त्यानुसार जळगावचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पी.व्ही.उगले यांची नियुक्ती झाली आहे. तर जळगावचे दत्ता शिंदे यांची मुंबई येथील सुरक्षा व अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. उगले ही जिल्ह्याचे 61 वे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत.

या अधीक्षकांचीही सहा महिन्यातच झाली होती बदली
दि. 3 ऑगस्ट 2018 मध्ये दत्ता शिंदे रुजू झाले होते. अवघ्या सहा महिन्यात तडकातङकी त्यांची तडकाफडकी बदली झाली. यात सहा महिन्यातच बदली झालेले शिंदे एकमेव अधिकारी नाही. यापूर्वीही एकाच महिन्यात आर.एन दहाते (1982) , एन.जी.सुरडकर (1986) तर सहा महिन्याच्या आत पी.डी.जाधव यांचीही वेगवेगळ्या कारणांवरुन उचलबांगडी करण्यात आली होती.

पंतप्रधानांचे चित्रीकरण प्रकरण भोवले की…?
धुळे दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव विमानतळावर चित्रीकरणाचा चोरुन चित्रीकरण झाले. याप्रकरणी गुप्तचर यंत्रणातर्फे वरिष्ठ पातळीवर पोलीस दल या घटनेस दोषी असल्याचा अहवाल पाठविण्यात आला. त्यामुळे शिंदे याची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे कौटुंबिक अडचणी तसेच राजकीय दबावात काम करण्याची मानसिकता नसल्याने त्यांनीच बदलीसाठी विनंती केली होती असेही समोर येत आहे.

अवैधंधंद्यांचे नूतन ‘एसपीं’समोर आव्हान
दत्ता शिंदे यांनी धमाकेदार एन्ट्री करत अवैध दारु विक्री, गुटखा, अवैध वाळू वाहतूक, सट्टा, जुगार अशा अवैधधंद्यावर कारवाईची धडक मोहिम राबविली. रात्री मध्यरात्री स्वतः नदीपात्रात उतरुन, रस्त्यावर उतरुन कारवाई करत अधीक्षकांनी अवैधधंदे व्यावसायिकांमध्ये धाक निर्माण केला होता. त्यामुळे जिल्ह्यात तुर्तास सर्व अवैधधंदे बंद आहेत. हे अवैधधंदे पुन्हा सुरु होवू नयेत, याचे नूतन अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासमोर राहणार आहे.

असे आहेत नूतन एसपी उगले
डॉ. पंजाबराव उगले यांचे बी.व्ही.एस आणि ए.एच असे शिक्षण झाले आहे.1996 मध्ये त्यांनी डेप्युटी सुपरिटेटंन्ट ऑफ पुलिस म्हणून नागपूर ग्रामीण, ठाणे सीटी, नवीन मुंबई येथे काम केले आहे. यानंतर पदोन्नती मिळून ते पोलीस उपआयुक्त म्हणून मुंबई व मुंबई शहर मध्ये म्हणून काम केले. यानंतर नवी मुंबई येथे सीआयडी चे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 2013 मध्ये डी.जी. इनसिग्नीया तर 2018 मध्ये पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहेत.