Saturday , February 23 2019
Breaking News

सहा सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना लागणार एलएचबी कोच

रेल्वे अपघातात नुकसान होणार कमी : रेल्वे प्रवास होणार सुखद

भुसावळ (गणेश वाघ)- रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद व सुखर होण्यासाठी सहा सुपरफास्ट रेल्वे गाड्यांमध्ये शुक्रवारपासून एलएचबी (लिंक हॉफमैन बुश) कोचेस लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कोचेचमुळे ताशी 100 ते 160 वेगाने धावणार्‍या रेल्वेत प्रवाशांना झटके बसणार नाहीत शिवाय रेल्वेच्या आवाजाच्या प्रदूषणापासून काहीशी सुटकादेखील होणार आहे. भारतात सुरुवातीला जर्मनी येथून हे कोच मागवण्यात आले होते हे विशेष तर हल्ली त्याची फॅक्टरी कपूरथला येथे कार्यरत आहे. एसी, नॉन एसी व स्लीपर प्रकारात हे कोच रेल्वे गाड्यांना लावण्यात येणार आहेत. एलएचबी कोचचे वैशिष्ट्य असे की, हे डबे रेल्वे रूळाखाली गाडी कितीही वेगात असलीतरी उतरत नसल्याने रेल्वे अपघातात मोठ्या प्रमाणावर नुकसान टाळता येत असल्याने हे कोच वापरण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या सहा गाड्यांना लागणार एलएचबी कोच
21 सप्टेंबरपासून 21202 अजनी-एलटीटी, 24 सप्टेंबरपासून 11201 एलटीटी-अजनी, 22 सप्टेंबरपासून 11205 एलटीटी-निजामाबाद, 23 सप्टेंबरपासून 11206 निजामाबाद-एलटीटी, 26 सप्टेंबरपासून 22135 नागपूर-रीवा व 22136 रीवा-नागपूर एक्स्प्रेसला एलएचबी कोचेस लावण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.

असा आहेत रेल्वे कोचेसमधील अरक
रेल्वे गाड्यांना लावण्यात येणार्‍या निळ्या डब्यांना (आयसीएफ) कोच संबांधले जाते तर हे कोचेस ताशी 70 ते 140 वेगाने धावू शकतात मात्र वाढत्या वेगामुळे आवाजाच्या प्रदूषणासह डबा सातत्याने हलत असल्याने प्रवाशांना काहीसा मनस्ताप होतो मात्र याउलट एलएचबी (लिंक हॉफमैन बुश) कोचमध्ये या प्रकाराचा कुठलाही त्रास होत नाही शिवाय 160 ते 200 कि.मी.वेगाने हे कोचेस धावू शकतात. स्टेनलेस स्टील व अ‍ॅल्युमिनिअम पदार्थांपासून या कोचेसची निर्मिती केली जाते. या कोचेसला डिस्क ब्रेक असल्याने तातडीने वेगावर नियंत्रणही मिळवता येते तसेच व्हीलही आकाराने छोटे असल्याने ते रूळाखाली उतरत नाही शिवाय कोचमध्ये असलेल्या माइक्रो प्रोसेसर कंट्रोल असल्याने वातानूकुलित यंत्रणा कोचमधील तापमान नियंत्रण ठेवते व दोन डब्यांमध्ये असलेल्या कपलिंगमुळे दुर्दैवाने अपघात झाल्यास एकावर एक डब्बे आदळत नाही त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसानही टळते, असे सूत्रांनी सांगितले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

‘आयकर’ला रुग्णालयांवरील कारवाईत हाती लागले मोठे घबाड

दागिणे, प्लॉटसह सर्व प्रकारच्या मालमत्तांची कसून चौकशी ः बेहिशोबी मालमत्ता सील जळगाव- आयकर विभागाच्या नाशिक, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!