सांगलीतील राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षांची हत्या !

0

सांगली : सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय पाटोळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांची तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली. मिरज औद्योगिक वसाहतीत हा खून झाला. तीन हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर चाकू, चॉपर आणि कोयत्याने वार केले.