Tuesday , March 19 2019

सांगवी नदीपात्रात अज्ञाताचा मृतदेह

नवी सांगवी : सांगवी येथे नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. पिंपरी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी मृतदेह बाहेर काढला आहे. संबधीत व्यक्तिचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. त्याची अद्याप ओळख पटली नसून मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह आढळल्याची माहिती एका स्थानिक नागरिकाने अग्निशमन दलास दिली. त्यानुसार संत तुकाराम अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तीन दिवसांपूर्वी इसमाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही कामगिरी पिंपरी अग्निशमन दलाचे फायरमन गाजरे, भूषण येवले, विठ्ठल सपकाळ, संतोष वारे, सावळी यांच्या पथकाने केली.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बिबट्याची मादी जेरबंद

ओतूर : जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे बिबट्याची मादी पिंजर्‍यात जेरबंद झाली. रविवारी वडगाव कांदळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!