साईबाबा जन्मभूमीचा वाद कोर्टात; पाथरीकरांनी घेतला कोर्टात जाण्याचा निर्णय

0

मुंबई: शिर्डीचे सगळ्यांचेच श्रद्धास्थान असलेली साईबाबा यांच्या जन्मभूमीबद्दल वाद निर्माण झाला आहे. शिर्डी आणि परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या नागरिकांमध्ये हा वाद सुरु झाला आहे. पाथरीकरांनी साईबाबा यांचा जन्मस्थळ पाथरी असल्याचा दावा केला आहे तर शिर्डीकरांनी साईबाबांचा जन्मस्थळ शिर्डीच असल्याचे सांगत दावा केला आहे. दरम्यान हे प्रकरण आता कोर्टात जाणार आहे. पाथरी संस्थानने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिली आहे. पाथरीकरांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शिर्डीकरांनी शिर्डी बंद देखील पाळला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत शिर्डी बंद मागे घेण्याचे सांगितले. शिर्डी बंद मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पाथरीला तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत स्वतंत्र निधी देत शिर्डी आणि पाथरीकरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र पथारीकर त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यातच बीडने देखील यात उडी घेतली आहे. बीडकरांनी साईबाबा यांनी बीडला नोकरी केल्याचा दावा केला आहे.