सामन्यातील जाहिरात सेनेची भूमिका ठरवीत नाही: उद्धव ठाकरे

0

मुंबई: सामना हा शिवसेनेचा मुखपत्र असून शिवसेनेतील लेख आणि जाहिरातीतील भाष्य म्हणजे शिवसेनेचे भाष्य समजले जाते. दोन दिवसांपूर्वी नाणार विषयीकी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यावरून शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर भूमिका बदलली असे आरोप झाले. मात्र यावर आज मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. सामन्यातील जाहिरात ही सेनेची भूमिका नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही असे त्यांनी सांगितले. सामना हा शिवसेनेचा मुखपत्र आहे. सामन्यातील लेख, अग्रलेख हेच शिवसेनेची भूमिका मांडत असतात, जाहिरातदार शिवसेनेची भूमिका मांडत नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध होता. तो कायम आहे. नाणारच्या बाबतीत शिवसेना कोठेही भूमिका बदलणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.