सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा सेवायज्ञ

0

जळगाव-सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने शहर लॉकडाऊन दरम्यान आज पुन्हा एकदा अन्नदान करण्यात आले. आज शहरातील असोदा रेल्वेगेट परिसर ते गोलाणी मार्केट पर्यंत, त्यासोबतच सुप्रीम कॉलनी, ट्रान्सपोर्ट नगर, इच्छादेवी मंदिर परिसर, जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच विविध भागात जाऊन गरजू नागरिक, भिक्षूक, निराधार वृद्ध आदी घटकांसाठी सेवा पुरविण्यात आली. या सेवेचा शेकडो व्यक्तींनी लाभ घेतला. पुरीभाजी पाकिटाद्वारे महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2,2 च्या गटाने जाऊन वितरण केले आजही पोलीस बांधवानी सदर सेवेचा लाभ घेतला.
या कार्यात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले,अनिल जोशी,अजय गांधी, सूरज दायमा, जगदीश जोशी, दीपक साखरे, धनंजय चौधरी, प्रणव नेवे, भूषण शिंपी, दीपक नाझरकर यांनी सेवा दिली.

दानशूर व्यक्तींची मोलाची मदत
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नारळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील सर्व स्तरातील दानशूर व्यक्ती व संस्थानी मोठ्या प्रमाणात मदतीची इच्छा व्यक्त केली आहे व एकप्रकारे या यज्ञात सहभाग नोंदवीत आहेत. समाजातील जास्तीत जास्त संवेदनशील नागरिकांनी या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.