सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेनेला घेरणार !

0

मुंबई: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवार अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दोन दिवस भाजपने शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवरून सरकारला कोंडीत पकडले होते. दोन दिवस भाजपकडून सभागृहात गदारोळ झाला. आजही भाजपकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे, मात्र ते सावरकरांवरून. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी भाजपकडून वारंवार होत आहे. आज भाजपकडून अधिवेशनात सावरकर गौरव सन्मान प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. सरकारने सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी ठराव करावा अशी मागणी भाजप करणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेस असल्याने ठराव करताना शिवसेनेची गोची होणार आहे. यावरूनच शिवसेनेला घेरण्याची तयारी भाजपकडून सुरु आहे.

आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आहे. त्यानिमित्त सभागृहात भाजपकडून ठराव मांडण्याची मागणी केली जाणार आहे.