सिंहगड घाट आठवडाभर बंद राहणार !

0

पुणे-सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी दरड कोसळली होती. यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला. हवेली पोलीस व वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला असून रस्त्यावर पडलेला राडारोडा हटवण्याचे काम सुरू आहे. यातील पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम करण्यासाठी आणखी सहा दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आणखी सहा दिवस सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक महेश भावसार यांनी दिली.

सिंहगड घाटात दरड कोसळल्याने  गडावर जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही 31 जुलै रोजी सिंहगड घाटात दरड कोसळली होती. त्यावेळी सायंकाळ असल्याने तब्बल तीन तास पर्यटक गडावर अडकून पडले होते. विशेष म्हणजे आजही मागील वर्षी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती तेथून जवळच्याच अंतरावर ही दरड कोसळली आहे. मात्र, पहाटेची वेळ असल्याने पर्यटक बचावले.