सिद्धीविनायक ग्रुप, जनशक्तितर्फे वारकर्‍यांना फराळाचे वाटप

0

सुमारे दिडशेहून अधिक दिंड्यांचे स्वागत : सेवेसाठी सिद्धीविनायक समूहाचे कर्मचारी सरसावले
निगडी । प्रतिनिधी – माऊलींच्या गजरात, ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात पंढरपूरकडे रवाना झालेल्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहूरोड येथून शुक्रवारी झाले. यावेेळी देहूवरून आकुर्डीकडे मार्गस्थ झालेल्या सुमारे 150 पेक्षा जास्त दिंड्यांमधील वारकर्‍यांना विविध संस्थांनी फराळाचे वाटप केले. यावेळी दैनिक जनशक्ति आणि सिद्धीविनायक ग्रुपतर्फे निगडी येथील पालखीच्या स्वागतासाठी श्रीकृष्ण मंदिराजवळ वैष्णवांचे स्वागत करून फराळाचे वाटप केले. वैष्णवांच्या स्वागतासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज झालेली असताना पोलीसांच्या चोख बंदोबस्तात लाखो वारकर्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दिंडीप्रमुखांचे श्रीफळ देऊन यथोचित सत्कारही करण्यात आला.

यांची होती उपस्थिती…
यावेळी सिद्धीविनायक समूहाचे अध्यक्ष कुंदन ढाके, यतीन ढाके, उपाध्यक्ष सुनील झांबरे, दैनिक जनशक्तिचे व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, निवासी संपादक अविनाश म्हाकवेकर, जाहिरात व्यवस्थापक अमित शिंदे, शेखर चौधरी, ए. पी. चौधरी, अ‍ॅड. पंकज चौधरी, अ‍ॅड. अमोल कुर्हाडे, मुकेश कोल्हे, विनोद सारस्वत, मिलिंद ढाके, तुषार भांबरे, सुनील आढाव, प्रदीप चव्हाण, धीरज नारखडे, रविंद्र बर्‍हाटे, अशोक भंगाळे, मधुकर पाचपांडे, अप्पा खाचणे, भानुदास इंगळे, रघुनाथ फेगडे, एन. डी. पाटील, रमेश इंगळे, रवि चोपडे, तुषार जगताप, लहू पोटे, अमित शिंदे, जयंत महाजन, शांतकुमार शिवशरण, वितरण विभागाचे अनिल दळवी, अभिमान विटकर, निलेश सायनकर आदीजण वारकर्‍यांच्या स्वागतासह सेवेमध्ये सहभाग घेतला. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, भाजप पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, एलएमसी ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद चौधरी, राजेश सावंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सेवेकर्‍यांमध्ये महिलांचाही सहभाग
कांचन ढाके, पूजा झांबरे, सपना चौधरी, रेखा भोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, शितल नारखेडे, आशालता चौधरी, प्रियंका जावळे, प्रतिभा ढाके, पल्लवी पाटील, योगिता नारखेडे आदी यावेळी उपस्थित होत्या.