सिद्धेश्‍वर नगराचा कायापालट होत असल्याचा अतिआनंद

0

नगराध्यक्ष सुनील काळे ; रस्ता कामाचे भूमिपूजन

वरणगाव- वरणगाव शहरात विकासाची कामे वेगाने सुरू असून पूर्वीचे वरणगाव व आताचे वरणगाव यात आता आमुलाग्र बदल होत असून सिद्धेश्वर नगर वस्तीत नगरपरीषदेच्या वतीने मूलभूत सोयी-सुविधा प्राधान्याने पुरवल्या जता असून अपल्या राजकीय जडणघडणीत सिदेश्वर नगरवासीयांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे केले. प्रभाग 17 मध्ये रस्ता काँक्रिटीकरच कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

सिद्धेश्‍वर नगराचा कायापालट करणार
नगराध्यक्ष काळे म्हणाले की, आपल्या राजकारणाची सुरुवात सिद्धेश्‍वर नगरापासून झाली असल्याने हे नगर माझे घर असून संपूर्ण सिद्धेश्‍वर नगर नगरसेविका माला मिलिंद मेढे यांनी केलेल्या मागणीनुसार नगरपरीषद रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे. याप्रसंग नगरसेविका माला मेढे, मिलिंद मेढे, वत्सलाबाई मोरे, आशाबाई मराठे, सुनीता बोदवडे, शांताबाई बोदवडे, राजू सैतवाल, तेजु जैन, कुंदन माळी, नथ्थू पवार, आकाश मेढे यांच्यासह शेकडो नागरीक उपस्थित होते.