सीआयएससीई मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल जाहीर

0

नवी दिल्ली: सीआयएससीई मंडळाचा दहावीचा (आयसीएसई) आणि बारावीचा (आयएससी) निकाल आज जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल ९९.३३ टक्के तर बारावीच्या परीक्षेचा निकाल ९६.८४ टक्के लागला आहे. विद्यार्थी आयोगाच्या www.cisce.org या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील. सीआयएससीईने मेरिट लिस्ट प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय करोनामुळे पत्रकार परिषदही घेणार नाही आहे.

२ लाख ७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील २ लाख ६ हजार ५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ५४.१९ टक्के असून ४५.८१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षेत ८८ हजार ४०९ विद्यार्थ्यांपैकी ८५हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

डिजीलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी लगेच अर्ज करता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ४८ तासास विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका उपलब्ध होणार आहे. यासाठी त्यांनी डिजीलॉकर अप डाउनलोड करावं लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठीच बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला. पुढील प्रवेशासाठी ही गुणपत्रिका ग्राह्य धरली जाईल.