सीएएमुळे होणारा त्रास सांगावा नाही तर मोदींची माफी मागावी; फडणवीसांचे पवारांना आव्हान !

0

मुंबई: आज मुंबईत भाजपचचा राज्य स्तरीय मेळावा होत आहे. मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील लक्ष केले. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे भटक्या-विमुक्तांना त्रास होईल असे विधान शरद पवार यांनी केले होते, मात्र सीएएमुळे भटक्या-विमुक्तांना कसला त्रास होणार आहे हे शरद पवारांनी सांगावे, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी असे थेट आव्हान फडणवीस यांनी दिले आहे.

“या देशातील काही पक्ष असे आहेत ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी हे काहाही करायला तयार आहेत असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.