सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलीच टॉप

0

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्डाच्या बारावीचा निकाल आज सोमवारी जाहीर झाला आहे. 88.78 टक्के निकाल लागला आहे. यात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. यात मुलींचे प्रमाण 92.15 टक्के आहे. cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. पुणे सीबीएसईचा निकाल 90.24 टक्के लागला आहे.