सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा अनर्थ लावू नका: खा. रक्षा खडसे

0

रावेर: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळें या शुक्रवारी जळगावच्या दौऱ्यावर असतांना खा. रक्षा खडसे यांचे कौतुक केले होते. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कौतुकाचा अर्थ-अनर्थ लावू नका असे खा. रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांना माझे काम करण्याची पध्दत आवडते म्हणून मी आवडत असेल असे भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी रावेरमध्ये सांगितले.

काल राष्ट्रवादीच्या खा सुप्रिया सुळे यांनी काल भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे यांची केलेल्या कौतुकामुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळुन निघाले होते. रावेरमध्ये खा. रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण केले. खा. खडसे या पंतप्रधान मुद्रा योजना व शासकीय योजनांचा तालुकास्तरीय मेळावा निमित्त रावेरमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत झेडपी अध्यक्षा रंजना पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन पाटील, पं.स. सभापती जितेंद्र पाटील, आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.