सुरतहुन आयशरने रावेरात परतलेल्या ८० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

0

सर्वांची जिल्हा रुग्णालयात तपासणी

जळगाव : कोरोनाच्या भितीने सुरत येथून रावेर परिसरात घराकडे मालवाहतूक आयशरने परतणाऱ्या ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रवाश्यांना जिल्हा सामन्य रुग्णालयात आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर देशात लॉकडाऊन असतांना राज्यातील विविध भागातून कामगार पायी किंवा मिळेल त्या वाहनाने घराकडे परतत आहे. अशातच सुरत येथे कामाला असलेले रावेर तालुक्यातील काही मजुर घराकडे परतत असल्याचे माहिती महामार्ग पोलीस व स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या प्रवाश्यांना पाळधी येथून ताब्यात घेत त्यांना एम.एच. १९ सीवाय ५८७१ या आयशरसह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्रवाश्यांमध्ये पुरुषांसह महिला व बालकांचा समानेश होता. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली आहे. सदर कारवाई एपीआय पवन देसले, हनुमंत गायकवाड, हेकॉ. अरुण निकुंभ, संजय महाजन, पो.ना. विजय चौधरी, दत्तात्रय ठाकरे यांच्या पथकाने केली.