सुरत-भागलपूर दरम्यान विशेष पार्सल मालगाडी धावणार

0

भुसावळ : कोरोनाच्या दुष्प्रभाव व लॉकडाऊन मुळे आवश्यक साधन सामग्रीची वाहतुक करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरत-भागलपुर दरम्यान विशेष पार्सल मालगाडी चालवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे देण्यात आली. ज्या लोकांना जीवनावश्यक साहित्य पाठवयाचे असेल त्यांनी आपल्या जवळच्या रेल्वे स्थानकावर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकडे संपर्क करावा व मागणीनुसार गाडीची फेरी वाढविण्यात येणार आहे.

सुरत-भागलपुर दरम्यान विशेष पार्सल गाडी (दोन फेरी)
गाडी क्रमांक 00917 डाऊन ही गाडी 10 व 12 एप्रिल रोजी सुरत स्थानकावरून सकाळी 10 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी भागलपुर येथे 6.40 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 00918 अप भागलपूर-सुरत पार्सल गाडी ही 12 व 14 एप्रिल रोजी भागलपुर स्थानकावरून 4 वाजता सुटून तिसर्‍या दिवशी रात्री 1 वाजता सुरत पोहोचेल. डाऊन दिशेत ही गाडी नंदुरबार, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, प्रयागराज, छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, दानापूर, पटना, क्यूँल तर अप दिशेने भुसावळ, जळगाव, नंदुरबार आदी स्थानकांवर थांबा घेणार आहे.