सुरवाडेतील तिघांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

0

बोदवड- तालुक्यातील सुरवाडा बुद्रुक येथे गुरे-ढोरे बांधण्याच्या कारणावरून तक्रारदारास मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बापू देवराम पाटील, हर्षल बापू पाटील व मंदा बापू पाटील यांच्या बोदवड पोलिसात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार प्रभाबाई गणपत पारधी यांच्या घरासमोरील व ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर गुढे-ढोरे बांधली व तक्रारदाराला तेथे न राहण्याचे बजावत जातीवाचक शिवीगाळ केली. उर्वरीत दोनघा आरोपींनी तक्रारदारासह जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश जाधव करीत आहेत.