सुविधांची कमतरता भासता कामा नये

2

फैजपूर : शहरात कोरोना रुग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी शहरातील कंटेन्मेंट झोन असलेल्या भागात जाऊन व फैजपूर कोविड सेंटरला जाऊन परीस्थितीचा आढावा प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याकडून घेतला.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून आढावा
कोरोना संसर्गजन्य आजार हा आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाय पसरू लागला आहे. यातच शुक्रवारी पोलिस प्रभारी अधिकारी यांची कन्या व तीन कर्मचारी यांचा अवाहल पॉझीटीव्ह आल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी शहरात येऊन कंटेन्मेंट झोन भागात पाहणी करून परीस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लागलीच फैजपूर कोविड सेंटर जाऊन तेथील रुग्णांच्या परीस्थितीची माहिती जाणून घेतली.

रुग्णांना सुविधांची कमतरता नको : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, जे संशयीत रुग्ण ऐकत नसतील त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करावे तसेच कोविड सेंटरमध्ये कुठल्याही सुविधांची कमतरता भासता कामा नये. काही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. आपले कर्तव्य आहे रुग्ण बरा झाला पाहिजे, ही परिस्थिती किती दिवस राहील याची कुणालाही कल्पना नाही म्हणून सर्वांनी आपली व रुग्णाची काळजी घेतली पाहिजे, आपल्या खिशातील पैसे खर्च झाले तरी चालतील पण सुविधा कमी पडता कामा नये अशा सूचना त्यांनी कर्मचार्‍यांना दिल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले, डीवाएसपी नरेंद्र पिंगळे, यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, रावेर तहसीलदार उषाराणी कुंवर, प्रभारी एपीआय राहुल वाघ, फैजपूर मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, फैजपूर सर्कल जे.डी.बंगाळे, तलाठी पी.पी.जावळे, डॉ.शहनाज तडवी, डॉ.कौस्तुभ तळेले, डॉ.राहुल गजरे, डॉ.मनीषा महाजन, डॉ.सुप्रिया थोरबोले यासह नर्स व कर्मचारी उपस्थित होते.