Sunday , March 18 2018

सैराटच्या ‘झिंग झिंग झिंगाट’ची नवी धडक…

नागराज मंजुळेचा सैराट लोकांनी डोक्यावर घेतला. आता याच चित्रपटाचा रिमेक जान्हवी कपूर आणि ईशानच्या धडकद्वारे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटचे शूटिंग राजस्थान आणि कोलकाता येथे सुरू असून करण जोहर निर्मिती करत आहेत. धडक या रिमेकमध्ये चित्रपटाचे नाव, कलाकार, दिग्दर्शक वेगळे असले तरी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक तेच आहेत. सैराटचे झिंगाट हे गाणे चित्रपटात असणार का? हा प्रश्‍न उपस्थित होणे साहजिकच कारण याच गाण्यामुळे सैराट चांगलाच गाजला होता. झिंगाट हे गाणे धडक या नावाने चित्रपटात अजय अतुल यांनी कंपोज केले आहे. इतकेच नव्हे तर या गाण्याचे चित्रीकरणही पूर्ण झाले आहे. रिमेक म्हटले की तुलना आलीच. झिंगाट या गाण्याशी प्रेक्षकांची असलेली जवळीक पाहता या गाण्याच्या रिमेकही तितकाच प्रभावी असणार का?

हे देखील वाचा

सलमान पुन्हा छोट्या पडद्यावर

सलमान खान व टीव्हीचे नाते फारच जवळचे आहे. त्याची अनोखी अदाकारी आणि सूत्रसंचालनाची तर्‍हा सर्वपरिचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *