सोनबर्डी येथे गावठी दारू भट्या पोलीस पाटीलसह गावकऱ्यांनी केल्या उद्ध्वस्त

0

एरंडोल :-एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील पोलीस पाटील शरद पाटील तसेच गावातील तरुण मंडळी यांच्या मदतीने गावालगतच्या गावठी दारू भट्या उध्वस्त केल्या. गावातील व बाहेर गावातील विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेकडे व ओढला जात होता. हे कुठेतरी थांबले पाहिजे, समाजात तरुणांपुढे एक आदर्श निर्माण व्हावा व तरुणांना सुसंस्कृत बनवावे.
या उद्देशाने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे पोलीस पाटील, त्यांच्याबरोबर गावातील तरुण अजय पाटील भाऊसाहेब पाटील,मयुर पाटील यांना सोबत घेऊन सोनबर्डी शिवारातील चार ते पाच गावठी दारूच्या भट्या उध्वस्त केल्या.