Saturday , February 23 2019
Breaking News

सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातून घसरणीचे संकेत मिळाल्यानंतर शुक्रवारी सोन्याच्या किंमती वायदे बाजारात ११२ रुपयांची घसरण होऊन सोनं ३१,३०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर येऊन पोहचलं. एमसीएक्सवर डिसेंबर करारासाठी सोन्याचा वायदे भाव ११२ रुपये म्हणजेच ०.३६ टक्क्यांनी घटले. यासाठी ४०९ लॉटचा व्यापार पार पडला. या पद्धतीनंच फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी २२ व्या लॉटच्या व्यापारात सोन्याचा वायदे भाव ११२ रुपयांनी घसरून ३१,५३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव १,१९९.४० डॉलर प्रति औंसवर राहिला.

चांदीचे भावही घसरले 

याच पद्धतीनं चांदीचे भावही वायदे बाजारात ११३ रुपयांनी घटले. चांदी ३८,८५८ रुपये प्रति किलोग्रॅमवर येऊन पोहचली. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर ७९० च्या लॉटमध्ये डिसेंबरसाठी चांदी ३८,८५८ रुपये प्रति किलोग्रॅम राहिली.

घरगुती बाजार

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत ७० रुपयांनी वाढ होऊन ३१,९५० रुपये प्रति किलोवर पोहचल्या. मुंबईत ३००१०, कोलकात्यात २९७४० रुपये प्रति १० ग्रॅम (२२ कॅरेट) सोन्याच्या किंमती होत्या. तर चांदीचे भाव दिल्लीत ३९३५० रुपये, मुंबईत ३८६०० रुपये, कोलकातामध्ये ४१५०० रुपयांवर पोहचले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी होणार?

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे खात्रिलायक वृत्त पंतप्रधानांच्या चोरुन चित्रीकरणाचा ठपका ठेवल्याचीही चर्चा कर्मचार्‍यांमध्ये दिवसभर गुर्‍हाळ  जळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!