सोशल मिडिया सेलच्या कर्मचार्‍यांनी भागवली झोपडपट्टीत चिमुकल्यांची भुख

0

खाकीतली माणुसकी पाझरली

जळगाव : जगभरात तसेच संपुर्ण भारतात कोरोना ने धुमाकुळ घातला आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाहिये. अशा झोपडपट्टी परिसरातील चिमुकल्यांची जिल्हा पोलीस दलाच्या सोशल मीडियाच्या सेलच्या कर्मचाऱ्यांनी जेवण घेवुन जात भुख भागविली असुन कर्तव्यासोबतच माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

जळगाव शहरातील झोपड़ी पट्टीतील 90 ते 100 लहान (2-10 वयोगटातील) बालक खायला नसल्याने भुखेने व्याकुळ असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस दलातील सोशल मिडिया सेल येथील कर्मचार्‍यांना मिळाली. त्यानुसार कुठलाही वेळ वाया न घालवता कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी वसिम मलिक, प्रिती नन्नवरे, प्रमोद वाडीले, भरत बेलदार यांनी सदरचा झोपडपट्टी असलेले ठिकाण गाठले. तसेच भुखेने व्याकुळ बालकांना जेवण उपलब्ध करुन दिले. केवळ उपलब्धच करुन देता कर्मचार्‍यांनी स्वत: चिमुकल्यांना बसवुन जेवण वाढले. जेवण पुर्ण होईपर्यंत कर्मवारी थांबुन होते. खाकितल्या कर्मचार्‍यांच्या सामाजिक बांधिलकीची जिल्हा पोलिस दलात एकच चर्चा सुरु आहे.

चिमुकल्यांच्या चेहर्‍यांवरील आनंद जिवनातील अविस्मरणीय क्षण

जेवणामुळे चिमुल्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरला आता तो आमच्या जीवनातला अविस्मरणी क्षण असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचार्‍यांनी बोलतांना व्यक्त केल्या. तसेच यामुळे कोरोना विरुद्ध लढण्याची उर्जा मिळाल्याचेही ते म्हणाले