‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’वर महापालिका दरमहिन्याला करणार 70 हजारांचा खर्च

0

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फे शहर परिवर्तन कार्यालयांतर्गत सिटीझन एन्गेजमेंट कार्यक्रम आणि सोशल मिडीया कॅम्पेन राबविण्याचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी अमोल देशपांडे यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी दरहमहा 70 हजार रुपये मोजले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या विविध प्रकल्पांच्या कामकाजांसाठी शहर परिवर्तन कार्यालय (सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस तथा सीटीओ) स्थापन करण्यात आली आहे. या कार्यालयामार्फत विविध माध्यमांचा उपयोग करून सिटीझन एन्गेजमेंट कार्यक्रम आणि सोशल मिडीया कॅम्पेन राबविण्यात येणार आहे.

शहराच्या विकासात नागरीकांना अंतर्भूत करून घेणे, नागरीकांची, तज्ज्ञांची मते जाणून घेवून सर्व्हेक्षण करणे आदी कामांचा समावेश आहे. त्यासाठी सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे.हे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिकेतर्फे ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ म्हणून तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. सुरूवातीच्या सहा महिने कालावधीसाठी ही नेमणूक असणार असून त्यासाठी दरमहा सत्तर हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील अनुभवानूसार त्यातील पाच उमेदवारांना मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य लेखापरिक्षक, मुख्य लेखापाल, कायदा सल्लागार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी आणि सीटीओ प्रतिनिधी म्हणून बार्बरा स्टॅन्कोविकोव्हा यांची निवड समिती आहे. त्याद्वारे 26 ऑक्टोबर रोजी मुलाखत घेण्यात आली. सुधीर देशमुख, परवेझ खान आणि अमोल देशपांडे या तिघांची मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये अमोल देशपांडे यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत.त्यामुळे त्यांची नेमणूक महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या सिटीझन एन्गेजमेंट कार्यक्रम आणि सोशल मिडीया कॅम्पेन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सोशल मिडीया एक्स्पर्ट म्हणून करण्यात आली आहे. त्यांना दरमहा देण्यात येणा-या 70 हजार रुपये मानधनापोटी एकूण सहा महिन्याचा खर्च 4 लाख 20 हजार रुपये इतका होणार आहे.