सोशल मीडीयावर व्हायरल व्हिडीओची दखल

0

रेशन दुकानदाराचे लायसन्स रद्द

नवापूर। सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन रेशन दुकांनदारचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

लॉकडाऊन दरम्यान गावातील पाड्यातील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना शासनाच्या रेशन दुकान एकमेव पर्याय असतो. स्वस्त धान्य दुकानाबाबत धान्य कमी देऊन जास्त पैसे घेणे अशा तक्रारी नियमित होत असतात. देशभर लॉकडाऊनमुळे गावपाड्यातील लोक स्वस्त धान्य दुकानावरच अवलंबून असतात. त्याचा फायदा स्वस्त धान्य दुकानदार घेत असल्याचे प्रकार काही दिवसापासून जळगाव जिल्हातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. असाच प्रकार लहान कडवान गावातील युवकांनी स्वस्त धान्य दुकानात धान्य कमी देऊन जास्त पैशाची मागणी करत असतांना युवकांनी मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करत होते. त्यावर दुकानदाराने आपली मुजोरी दाखवत व्हिडीओ काढत असताना युवकांना मारहाण केली होती.

संबधित युवकांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. संपुर्ण जिल्ह्यात हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला. नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी त्याची दखल रेशन दुकानदाराचे लायसन्स रद्द केले आहे.