Sunday , March 18 2018

स्टायलिश विन्टर कॅप्स

स्टायलिश, वॉर्म आणि थोडी हटके विन्टर कॅप या सिझनमध्ये खरेदी करण्याचा चान्स महिला आणि तरुणी शोधताना दिसतात. यंदाच्या विन्टर सिझनमध्ये पारंपरिक मफलर, स्कार्फ वा स्टोल्स गुंडाळण्यापेक्षा आकर्षक रंगात, डिझाईनमध्ये उपलब्ध असणार्‍या विन्टर कॅप्सने महाविद्यालयीन वा कार्यालयीन पोषाख उठावदार करता येईल. लहानग्यांकरिताही अशा कॅप्स विविध आकारांत उपलब्ध आहेत. पॉलिस्टर, कॉटन आणि लोकरीपासून तयार झालेल्या या कॅपचे फॅब्रिक उबदार आणि केसांना, त्वचेला मुलायम स्पर्श देणारे ठरले आहे. विविध रंगांत, तसेच बजेटमध्ये या कॅप बाजारात दाखल झाल्या आहेत. ई-दिवाळी साजरी केल्यानतर यंदाच्या विन्टर सिझनची उबदार कपडे खरेदीही ऑनलाइन करता येते. आकर्षक कॅप उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा

सलमान पुन्हा छोट्या पडद्यावर

सलमान खान व टीव्हीचे नाते फारच जवळचे आहे. त्याची अनोखी अदाकारी आणि सूत्रसंचालनाची तर्‍हा सर्वपरिचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *