स्त्री दास्यत्वाचा विचार स्त्रियांनीच झुगारावा – नजूबाई गावीत

0

चाळीसगाव येथील राष्ट्र सेवा दलातर्फे सन्मान अभियानाचा समारोप

चाळीसगाव- स्त्री दास्य हे स्त्रियांनाच झुगारावे लागणार आहे. हा विचार महिलांनी मनात पक्का केला पाहिजे. त्यासाठी वाचावे लागेल, विचार करावा लागेल, लढावे लागेल आणि यातूनच महिलांमध्ये प्रबळ आत्मविश्‍वास निर्माण होईल. त्यामुळे मी कोणाची दासी म्हणून राहणार नाही. हा विचार नष्ट करण्यासाठी स्त्री दास्यत्व स्वतः स्त्रियांनीच झुगारावे असे आवाहन लेखिका तथा सत्यशोधक संघटनेच्या आदिवासी कष्टकरी नेत्या नजूबाई गावीत यांनी केले.
राष्ट्र सेवा दलाच्या शाखेतर्फे साने गुरुजी मार्गावरील कार्यालयात नुकत्याच झालेल्या सन्मान अभियानाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यानिमित्ताने उपस्थित महिलांनी महिलांवरील हिंसेला नकार एल्गारचा संकल्प केला. नजूबाई गावीत यांनी उपस्थित महिलांना अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी धुळे येथील राष्ट्र सेवा दलाच्या प्रमुख कार्यकर्त्या प्रा. आरती बरीदे यांनी स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्य काही वेळा स्वीकारले जाते. मात्र त्यापुढे विचार, निर्णय, वाचन, लिखाण, कृती यासारख्या स्वातंत्र्यावर बोलायचे म्हटले तर अडचण होते. म्हणून ज्या परंपरा बाईचे माणूसपण नाकारतात, त्यांचे शोषण करतात त्या नाकारण्याचे काम काम आपण केले पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी सारिका चव्हाण, साधना पाटील, सेवा दलाचे कार्याध्यक्ष गणेश गायकवाड, नगरसेविका सविता राजपूत आदी उपस्थित होते. कोमल गोंधळी यांनी प्रास्ताविक केले. नंदा देशमुख यांनी सूत्रसंचालन तर धीरेंद्र रावते यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांवरील हिंसेंला नकार संकल्प दर्शना पवार व माया पाटील यांनी केला. यशस्वितेसाठी भारती सोनवणे, अरूण भोसले, गोपाळ नेवे, स्वाती रावते, शीतल गायकवाड, दीपक लांबोळे, प्रा. विजय शिरसाठ, कैलास चौधरी, वैशाली लांबोळे, वैभव राजपूत, वंदना चौधरी, कल्पेश राणा, आकाश धुमाळ, अजिंक्य भोसले, गायत्री शिरोडे, श्‍वेता जगताप, प्रसाद जाने, पाकीजा खाटीक, संगीता पाटील यांनी परीश्रम घेतले.