स्मारकाची रक्कम रुग्ण सुविधेवर खर्च करा

0

पिंपरी : महापालिकेने निगडी प्राधिकरण येथे यशवंतराव चव्हाण स्मारक उभारण्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम स्मारकासाठी न देता पिंपरी, संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) रुग्ण सुविधा सुधारण्यासाठी खर्च करावेत, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. स्मारक उभारण्याचा ठराव स्थायी समिती समोर मांडण्यात आला. 16 मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत तो मंजुर केला आहे. मात्र हे 5 कोटी रुपयांची रक्कम स्मारकासाठी न कर्च करता महापालिका प्रशासनाने वायसीएम रुग्णालयातील रुग्णांच्या सुविधेसाठी खर्च करावेत. वायसीएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी किंवा आरामासाठी कोणत्याही प्रकारची महापालिका प्रशासनाने सुविधा उपलब्ध केलेली नाही.