स्मार्ट सिटीचे ‘कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर’ निगडीत !

0

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे ‘कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर’ महापालिकेच्या निगडीतील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलातील अस्तित्व मॉल येथे सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरद्वारे संपूर्ण शहरावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍याद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. हे सेंटर उभारीची मुदत दीड वर्षे आहे.

स्मार्ट सिटीच्या ‘पॅन सिटी’ अंतर्गत हे सेंटर राबविण्यात येत आहे. त्यासाठी 441 कोटी खर्च अपेक्षित आहे. कंट्रोल अ‍ॅण्ड कंमाड सेंटर (सिटी ऑपरेशन सेंटर) निगडीतील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुल येथे असणार आहे. त्याद्वारे 25 लाख लोकसंख्येच्या शहरावर 24 तास लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडल्यास तातडीने मदत पोहचविणे शक्य होणार आहे. प्रगत देशातील या प्रकारच्या अद्ययावत सेंटरमुळे नागरिकांच्या सुरक्षेसह खबरदारी, विविध सोयी सुविधा पुरविणे आणि जनजागृतीसाठी लाभ होणार आहे.

या सेंटरचे नियंत्रण पूर्णपणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे असणार आहे. मात्र, देखभाल व दुरूस्तीचे काम स्मार्ट सिटीअंतर्गत राहणार आहे. तसेच, त्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती स्मार्ट सिटीद्वारे केली जाणार आहे. हे सेंटर दीड वर्षांत पालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत विकसित करण्याचे नियोजन आहे.