स्वच्छता सर्वेक्षणात शहराची घसरण

0

देशात 52 तर राज्यात 13 वे स्थान

पिंपरी – केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण यादीत पिंपरी-चिंचवड शहराचा 52 वा क्रमांक आला आहे. 2018 मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहराचा देशात 43 वा तर राज्यात 6 व्या क्रमांकांवर होतो. त्यामध्ये यंदा घसरण झाली आहे. देशात 52 तर राज्यात 13 वा क्रमांक आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा कचरा होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचा बुधवारी 6 रोजी निकाल जाहीर झाला आहे.

जनजागृतीचा उपयोग नाही
व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे, या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. पिंपरी-चिंचवड शहरात 4 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान राबविण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. परंतु, निकालात शहराची घसरण झाली आहे.

पुणे 37 व्या स्थानी
2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर टॉप 10 मध्ये होते. शहराचा 9 वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून 1 नंबर आला होता. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले. 9 व्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर थेट 72 व्या नंबरवर फेकले गेले होते. तर, गतवर्षी त्यामध्ये सुधारणा होऊन देशात 43 वा क्रमांक आला होता. तर, राज्यात 6 व्या क्रमांकावर होतो. यावेळी पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे. शहराचा स्वच्छ सर्वेक्षणात देशात 52 वा तर राज्यात 13 वा क्रमांक आला आहे. पुण्याचा 37 वा क्रमांक आहे.