स्वतः चा गळा चिरणार्‍या परप्रांतीयांच्या ओळखीसाठी मोबाईल ठरला ‘दुवा’

0

आर्यनपार्कजवळ सापडला होता मृतदेह 

तालुका पोलिसांच्या कामगिरीला सॅल्युट

जळगाव – शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरात स्वतः गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या करणार्‍या तरुणाचा 10 रोजी आर्यनपार्क परिसरात त्याचा मृतदेह सापडला होता. ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मृतदेहाजवळ सापडलेला मोबाईल त्याची ओळख पटविण्यासाठी महत्वाचा दुवा ठरला. तौकिर आलम शब्बीर आलम रा. मुज्जफरपूर रा. मिटनपुरा असे तरुणाचे नाव आहे. तालुका पोलिसांनी कंट्रोल रुम, बिहार पोलीस या माध्यमातून त्याच्या नातेवाईकांचा संपर्क मिळविला. संपर्क साधून शनिवारी तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. जळगावच्या खाकीच्या कामगिरीला परप्रांतीयांनी सॅल्युट करत परतीच्या प्रवासाला रवाना झाले.

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात 10 रोजी तौकिरने स्वतः गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माहिती मिळाल्यावर गस्तीवर शहर पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. जिल्हा रुग्णालयातून 11 रोजी तौकिरने जखमी अवस्थेत पळ काढला होता. तपासयंत्रेणेच्या अथक परिश्रमानंतर 12 रोजी आर्यन पार्क परिसरात तौकिरचा मृतदेह आढळून आला होता.

मृतदेह सापडला पण.. ओळख पटेना?
मृतदेह सापडला मात्र त्याची ओळख पटत नव्हती, शहर पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार त्याचे तौकिर आलम एवढचे नाव समोर आले होते. तसेच त्याच्याजवळ कुठलाही ओळखीचा पुरावा नसल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या होत्या. तालुका पोलीस ठाण्याचे संजय चौधरी यांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलवरुन त्याच्या ओळखीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. याच मोबाईलमधील संपर्क क्रमांकावरुन तो बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस कंट्रोल रुम, बिहार पोलीस असे सूत्र हलविल्यावर मयत तौकिरच्या गावाचा छडा लागला. त्यानुसार तेथील पोलिसांच्या माध्यमातून तालुका पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना प्रकार कळविला. शुक्रवारी सकाळी तौकिरच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले व मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांमुळे तौकिरचा तपास लागला. त्यामुळे अंत्यविधीसाठी गावची जमीन नशिब झाल्याने परप्रांतीय नातेवाईकांनी तालुका पोलिसांचे आभारही मानले.

हे प्रश्‍न झाले उपस्थित
नेमका तरुण जळगावात आला कसा? जिल्हा रुग्णालयातून पळाल्यानंतर त्याचा मृतदेह आर्यनपार्क परिसरात आढळला कसा? या प्रश्‍नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. याबाबत नातेवाईकांना विचारणा केली असता, तौकिर मानसिक आजारी होता, त्यातच सर्व प्रकार घडला असल्याचेही ते म्हणाले.